प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरीत बुधवारी रात्री खवले मांजर व मांडूळ तस्करीचा प्रयत्न पोलीसांनी हाणून पाडला. याप्रकरणी जिल्हय़ातीलच 8 जणांना अटक करण्यात आली असून त्यांना दोन दिवसांची पोलीश कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, या तस्करीमागे चिनी कनेक्शनची शक्यता वर्तवली जात आहे. प्रामुख्याने चिनमध्ये खवल्यांना मागणी असून त्याची कोटय़वधीत विक्री होते. पश्चिम घाटात सापडणाऱया या दुर्मिळ खवले मांजरांच्या खरेदी-विक्रीमध्ये चिनी एजंट सक्रीय असल्याची माहिती समोर येत असून त्या दिशेने तपास सुरू आहे.
खवले मांजर व मांडूळ जातीचा साप या प्राण्यांना राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आह़े त्याच अनुषंगाने रत्नागिरीतही या प्राण्यांची तस्करी करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होत़ी त्यानुसार बनावट गिऱहाईक बनून पोलिसांनी वन्यप्राण्याच्या तस्कारीसाठी या टोळीकडे बोलणी सुरू केल़ी यावेळी मोठय़ा रकमेची ऑफर या टोळीला देण्यात आली होत़ी पैशाच्या लोभातून या टोळीने खवले मांजर व मांडूळ जातीचा साप विक्री करण्यास सहमती दर्शवल़ी
बुधवारी काजरघाटी येथे शहर पोलिसांनी सापळा रचून दुचाकींवरून आलेल्या 8 जणांना ताब्यात घेतल़े त्यांच्याकडून 1 खवले मांजर व मांडूळ जातीचा साप ताब्यात घेण्यात आल़े अटक करण्यात आलेले सर्व संशयित आरोपी हे जिह्यातीलच आहेत. त्यामुळे खळबळ उडाल़ी यापूर्वी देखील जिह्यातून वन्य प्राण्याची तस्करी केल्याच्या घटना समोर आल्या होत्य़ा त्यामुळे अटक करण्यात आलेल्या संशयितांचे अन्य कोणी सहकारी जिह्यात कार्यरत आहेत का याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आह़े
संशयितांना दोन दिवस कोठडी
तस्करीप्रकरणी शहर पोलिसांनी अटक केलेल्या 8 जणांना गुरूवारी न्यायालयापुढे हजर करण्यात आल़े सर्व संशयितांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल़ी अटक करण्यात आलेल्यामध्ये रणजित सुरेंद्र सावंत (38, ऱा झाडगांव रत्नागिरी), सुनील अनंत देवरूखकर (34, ऱा पोचरी सोनारवाडी), ओमकार राजेश लिंगायत (24, ऱा गुरूववाडी खानूमठ त़ा लांजा), दीपक दिनकर इंगळे (24, ऱा कनगवली त़ा लांजा), संदेश रामचंद्र मालगुंडकर (39, ऱा धामापूर संगमेश्वर), दिनेश दत्ताराम मोंडे (29, ऱा आडीवरे त़ा राजापूर), प्रमोद वसंत कांबळे (39, ऱा कारवांचीवाडी रत्नागिरी) व लक्ष्मण बबन नाडे (49, ऱा धामणी संगमेश्वर) आदी संशयितांचा समावेश आह़े
अंधश्रद्धेसाठी प्राण्यांचा वापर
मांडूळ जातीचा साप घरात ठेवल्याने मोठय़ा प्रमाणावर धनलाभ होत़ो अशी अधश्रद्धा समाजात रूढ आह़े त्यातुन दुर्मिळ असलेल्या या सापाला काळ्या बाजारात लाखो रूपयांची मागणी असत़े यातूनच या सापाची तस्करी केली जात़े असे पोलीस अधिकाऱयांनी सांगितल़े
7 दिवसांपासून दोन्ही प्राणी उपाशी
तस्कारी करणाऱया टोळीने 7 दिवसांपूर्वी या प्राण्यांना पकडले होत़े खवले मांजराला जाळ्यामध्ये बंदीस्त करून ठेवण्यात आले होत़े तर मांडूळही बंदिस्त करून ठेवण्यात आले होत़े त्यांना कोणतेही अन्न देण्यात न आल्याने ते अशक्त झाले होत़े दरम्यान बुधवारी रात्रीच या प्राण्यांना वनविभागाच्या ताब्यात देण्यात आल़े
पर्यावरणाचे संतुलनात महत्वाची भूमिका
खवले मांजर हे वन्यप्राणी शेडय़ूल एक मध्ये येणारा दुर्मिळ प्राणी आह़े खवले मांजराचा मुख्य आहार किडे मुंग्या आहेत़ दिवसाला 1 लाख मुंग्या हा प्राणी खात असत़ो त्यामुळे पर्यावरणातील मुंग्यांचे प्रमाण देखील नियंत्रणात राहत़े यासाठी हा प्राणी पर्यावरणाचे संतुलन राखण्यात महत्वाची भूमिका पार पाडत़ो
तस्करी करणाऱया रॅकेटचा कसून तपास
अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून महत्वाची माहिती समोर आली आह़े हे तस्कर नेमके कुणासाठी काम करत होत़े त्यांचे अन्य सहकारी आहेत का याबाबत कसून तपास करण्यात येत आह़े लवकरच याबाबतची माहिती समोर येईल अशी माहिती शहर पोलीस निरिक्षक अनिल लाड यांनी दिल़ी