ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 70 हजार 589 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 776 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 61 लाख 45 हजार 292 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 96 हजार 318 एवढी आहे.
सध्या देशात 9 लाख 47 हजार 576 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 51 लाख 01 हजार 398 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
देशात आतापर्यंत 7 कोटी 31 लाख 10 हजार 041 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 11 लाख 42 हजार 811 कोरोना चाचण्या सोमवारी एका दिवसात करण्यात आल्या.