प्रतिनिधी / वाई
वाई तालुक्यातील भोगाव येथील पांडेवाडी स्मशानभूमीलगत असलेला ट्रान्सफॉर्मरमधील 150 किलो 40 हजार रुपयांची तांब्याची तार अज्ञात चोरट्याने दि.30 रोजी रात्री चोरून नेली.याची फिर्याद वाई पोलीस ठाण्यात कनिष्ठ अभियंता विकास शेरकर यांनी दाखल केली असून वाई पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक धायगुडे हे तपास करत आहेत.