प्रतिनिधी / बेळगाव
शहर गट शिक्षणाधिकारी व मार्कंडेय हायस्कूल कंग्राळी यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव शहर व परिसरातील माध्यमिक शाळांमधून प्रथम भाषा मराठी विषय शिकविणाऱया शिक्षकांची पूर्वसभा कार्यशाळा उत्साहात पार पडली. शाळेच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी मार्कंडेय हायस्कूलच्या मुख्याध्यापिका एन. जे. चौगुले होत्या.
व्यासपीठावर बेळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष व बालिका आदर्शचे शिक्षक एकनाथ पाटील, ठळकवाडी हायस्कूलचे सी. वाय. पाटील, महिला विद्यालयाच्या अस्मिता देशपांडे, सरदार्स हायस्कूलचे रणजीत चौगुले उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत मार्कंडेय हायस्कूलच्या शिक्षिका आर. एम. अष्टेकर यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी विविध उपक्रम राबविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. दहावीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी कार्यशाळा घेण्याचे ठरले. तसेच वेगवेगळय़ा प्रश्नपत्रिका आणि पुस्तिकाही तयार करण्यात येणार आहे. यावेळी एकनाथ पाटील, सी. वाय. पाटील, रणजीत चौगुले यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला राम गुरव, रामू खांडेकर, बी. एम. पाटील, बी. जी. पाटील, मोहन अष्टेकर, संजय नरेवाडकर, एस. बी. कुंभार, श्वेता जाधव उपस्थित होते. सूत्रसंचालन आर. एम. अष्टेकर तर संजय नरेवाडकर यांनी आभार मानले.