प्रतिनिधी / सांगली
अल्पावधीत बुधगाव व परिसरातील सभासदांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या श्री साई दत्त को- ऑप.क्रेडीट सोसायटी लिमिटेड या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभेचे विठ्ठल मंदीर मंगल कार्यालयामध्ये आयोजन करण्यात आले होते. संस्थेने एका वर्षाभरात अडीच कोटींची उलाढाल केली आहे. तसेच गावामध्ये कोरोनाच्या पार्श्वभुमीवर स्व:ताचे अस्तित्व धोक्यात घालून काम करणारे रेशनिंग दुकानदार व सलून व्यवसायिकांचा सत्कार व गावातील जेष्ठ नागरिक कृष्णा भिमा भगत यांना 105 वर्ष पुर्ण झाल्याबद्दल त्याचा ही सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे चेअरमन व मिरज पंचायत समितीचे सदस्य विक्रम पाटील, व्हा चेअरमन विनायक शिंदे, संस्थेचे सेक्रेटरी अविनाश पाटील, सांगली जिल्हा भाजपाचे ग्रामीण उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, पोपट भगत , संभाजी पाटील, मनोहर पाटील, गजानन जाधव , अनिल पाटील, सागर गुरव, दिनकर साळुंखे व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.