ऑनलाईन टीम / बिहार :
बिहारमध्ये दिवसभरात 309 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 5 जणांचा मृत्यू झाला. त्यासोबतच बिहारमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 लाख 48 हजार 668 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, कालपासून 309 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर बिहारमधील एकूण 2,48,668 रुग्णांपैकी आता पर्यंत 2 लाख 42 हजार 244 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात रुग बरे होण्याचे प्रमाण 97.42 % आहे. तर आतापर्यंत 1,367 कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, बिहारमध्ये आतापर्यंत जवळपास 1 कोटी 74 लाख 53 हजार 751 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 5 हजार 056 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.