यंदा नेहमीपेक्षा ख्रिसमस ट्रीची विक्री अधिक : बेकरांमध्ये विविध प्रकारचे केक उपलब्ध
प्रतिनिधी / बेळगाव
दया, क्षमा, शांती असा संदेश देत त्याचे आचरण केलेल्या येशू ख्रिस्तांचा जन्म दिवस म्हणजेच ख्रिसमस साजरा करण्यासाठी ख्रिस्ती समाजाची तयारी सुरू आहे. यंदा कोरोनामुळे ख्रिसमस उत्सवावर मर्यादा आल्या आहेत. तथापि परंपरेनुसार ख्रिसमस साजरा केला जाणार आहे. अर्थातच बाजारपेठसुद्धा ख्रिसमससाठी आठवडय़ाभरापूर्वीच सज्ज झाली होती.
बाजारपेठेत सांताक्लॉजच्या प्रतिकृती, टोप्या, मुखवटे, ख्रिसमस ट्री, त्यावर सजावट करण्यासाठी चांदण्या, चकाकते बॉल, झिरमिळय़ा, फुगे, सिरॅमिकच्या बाहुल्या व प्रामुख्याने विविधरंगी मेणबत्त्या, नाद करणाऱया घंटा म्हणजेच जिंगलबेल्स यांची खरेदी सुरू आहे. ख्रिस्ती बांधवांप्रमाणेच विविध कॉर्पोरेट कंपन्यांनी केलेल्या आवाहनानुसार अन्य तरुण-तरुणींनी, कर्मचाऱयांनी आपापल्या घरी ख्रिसमस ट्रीची सजावट करून त्याचा व्हिडिओ कंपनीला पाठविला आहे. त्यामुळे यंदा नेहमीपेक्षा ख्रिसमस ट्रीची विक्री अधिक प्रमाणात झाली आहे.
ख्रिसमस आणि केक यांचे समीकरण दृढ आहे. त्यामुळे बेकरीमध्ये विविध प्रकारचे केक तयार करून दुकानदार ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. याशिवाय समाज माध्यमांवर महिलांनी आपण करत असलेल्या केकची माहिती मोठय़ा प्रमाणात व्हायरल केली आहे. त्या ठिकाणी त्यांना ऑर्डरही मिळत आहेत. ख्रिसमसनिमित्त घराघरात ठराविक खाद्यपदार्थ तयार करण्यात येत आहेत.
चर्चवर विद्युत रोषणाई
दरवषीप्रमाणे चर्चवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. प्रथेनुसार ख्रिस्ती बंधू-भगिनींनी चर्चमध्ये जाऊन कन्फेशन केले आहे. आपल्या हातून काही चुका झाल्या असल्यास, कोणी दुखावले असल्यास आपली चूक झाली असून, जिजसने आम्हाला माफ करावे, अशी कन्फेशनच्या मागची भावना आहे. दरवषी चर्चमध्ये उत्तर रात्रीपर्यंत जल्लोष सुरू असतो. यंदा मात्र कोरोनाने त्यावर मर्यादा आणल्या आहेत. अर्थातच ख्रिस्त जन्माचा कार्यक्रम व पाटर्य़ा यांना सामान्यजण मुकणार आहेत.
दरम्यान, आठवडाभरापासून कॅरल सिंगिंग सुरू झाले आहे. चर्चतर्फे त्या-त्या चर्चचे प्रतिनिधी विविध भागात जाऊन सायंकाळच्यावेळी विविध गाणी सादर करतात, त्याला कॅरल सिंगिंग म्हटले जाते.
कोरोनामुळे ख्रिसमस साजरा करण्यावर मर्यादा आल्या असल्या तरी ‘सांताक्लॉज’ येऊन भेटवस्तू देणार याचे औत्सुक्मय बच्चे कंपनीमध्ये कायम आहे.