प्रतिनिधी / खेड
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीच्या विकी उर्फ हनुमंत जाधव / गोसावी याच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुजित गडदे, विनय पाटील आदींच्या पथकाने भरणा नाका येथे शुक्रवारी दुपारच्या सुमारास मुसक्या आवळल्या.
सांगली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात हवा असलेला आणि फरारी आरोपीच्या शोधार्थ पोलीस असतानाच फरारी आरोपीबाबतची माहिती सर्वच पोलीस ठाण्यांना बिनतारी संदेशाने फोटोसह माहिती देऊन आरोपीला ताब्यात घ्यावी. असा आदेश पोलीस ठाण्यांना मिळताच येथील पोलिसांनी सापळा रचला व या आरोपीच्या मुसक्या आवळल्या खेड पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.