वार्ताहर / किणये
बिजगर्णी येथील महालक्ष्मी मंदिराचा स्लॅबभरणी कार्यकम मोठय़ा उत्साहात झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिजगर्णी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष यल्लाप्पा बेळगावकर होते तर स्लॅबभरणीचे पूजन आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते करण्यात
आले.
कार्यक्रमाला स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले पुंडलिक जाधव यांनी प्रास्ताविक करून मान्यवरांचे स्वागत केले. आर. एम. चौगुले, जिल्हा पंचायत उपाध्यक्ष अरुण कटांबळे, शिवाजी बेटगिरीकर, शांतीनाथ बोगार आदींच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. एपीएमसी सदस्य सुधीर गड्डे, एस. आर. मोरे, विठ्ठल मोरे, बाळू देसूरकर, बजरंग पाटील, आदींच्या हस्ते विविध देवदेवतांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
राजू मुचंडीकर, सुधा अष्टेकर, मारुती नाईक, राजेंद्र शिंदे, दीपक इटगिकर, गोविंद जाधव, अनिल पाटील, मिथुन राऊत, अशोक जाधव, एस. आर. मोरे, व्ही. आर. मोरे, संदीप अष्टेकर आदींच्या हस्ते
दीपप्रज्वलन करण्यात आले.
मंदिरे ही गावातील नागरिकांसाठी एकात्मतेचे प्रतिक असतात. बिजगर्णी गावातील महालक्ष्मी मंदिरासाठी पंचक्रोशीतील नागरिकांचा उत्साह पाहून समाधान वाटत आहे, असे मनोगत आमदार हेब्बाळकर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाला परशराम पाटील, विष्णू पाटील, गुंडू बास्कळ, राजू निलजलकर, बाळू संभाजीचे, पुंडलिक तारीहाळकर, तुकाराम तारीहाळकर, यलाप्पा मोरे, नवीन भुसे, कल्लाप्पा तारीहाळकर, आनंद जाधव, नारायण जाधव, सदानंद जाधव, तालुका पंचायत माजी सदस्य बी.आय. पाटील, आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले दशरथ सूर्यवंशी यांचे भाषण झाले. पंचक्रोशीतील नागरिक या कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने उपस्थित होते.