प्रतिनिधी / पणजी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात जाऊन केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांची भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली.
नाईक यांची प्रकृती आता बरीच सुधारली असून ते उठून बसतात तसेच फिरू लागले आहेत. त्यांच्या सर्व तपासण्या व चाचण्यांचे अहवाल चांगले येत असून त्यांची पातळी योग्य त्या प्रमाणात असल्याची माहिती गोमकॉच डिन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली.