प्रतिनिधी / वास्को
मेस्तावाडा वास्को भागात शनिवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास एका घरावर माड कोसळून किरकोळ हानी झाली. सुदैवाने कुणीही या घटनेत जखमी झाला नाही.
मेस्तावाडा येथील दिनानाथ च्चारी यांच्या घरावर हा माड कोसळला. या घटनेमुळे घराच्या छताची हानी झाल्याने तीस हजार रूपयांचे नुकसान झाले. मात्र, घरातील कुणालाही इजा झाली नाही. वास्कोतील शासकीय अग्नीशामक दलाने रविवारी सकाळी या घरावरील माड हटवून धोका दूर केला.