वार्ताहर / कडोली
सांगली येथे फार्थ इन्व्हिटेशन ओपन कराटे चॅम्पियनशीप युनिक शॉटकॉन कराटे डू असोसिएशनच्यावतीने दि. 7 रोजी घेण्यात आलेल्या ओपन कराटे स्पर्धेत बेळगाव ग्रामीण भागातील शॉटकॉन कराटे डू स्पोर्ट्स अकॅडमीच्या स्पर्धकांनी सुयश संपादन केले.
या स्पर्धेत सुजल सिद्रायी कलखांबकर (मण्णीकेरी), जितेश जोतिबा तवणोजी (बोडकेनहट्टी), रोहित मारुती तवणोजी (बोडकेनहट्टी), प्रतिक मारुती गावडे (हंदिगनूर), गौतम शिवाजी हुंदरे (चलवेनहट्टी), शेखर परशराम बसर्गे (बोडकेनहट्टी), संकेत मारुती तवणोजी (बोडकेनहट्टी), जयम शांताराम पाटील (चलवेनहट्टी) रोशन सुधीर कंग्राळकर (अगसगा), सिद्धेश सुरेश डोणकर (अगसगा), ओमकार कल्लाप्पा तवणोजी (बोडकेनहट्टी) सुजल सुरेश जाधव (बोडकेनहट्टी) आदी सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. सुमित मल्लाप्पा पाटील (हंदिगनूर), सुजल परशराम जाधव (बोडकेनहट्टी), वेदांत मारुती जाधव (बोडकेनहट्टी), धनराज तुकाराम पाटील (बोडकेनहट्टी) आदी रौप्यपदकाचे मानकरी ठरले. हे सर्व स्पर्धक 10 ते 16 वयोगटातील असून त्यांनी शॉटकॉन कराटे डू स्पोर्ट्स अकॅडमी संस्थेचे नाव उज्ज्वल केले आहे.
या स्पर्धकांना मार्गदर्शक म्हणून लाभलेले कराटे मास्टर भरमाणी यल्लाप्पा पाटील आणि स्पर्धकांचे चलवेनहट्टी, हंदिगनूर, अगसगा, बोडकेनहट्टी, मण्णीकेरी आदी भागातून अभिनंदन होत आहे. सदर स्पर्धकांना सांगली येथे मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, चॅम्पियन ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.