वृत्तसंस्था/ ऍडलेड
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या ऍडलेड खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत प्रेंच ग्रॅण्डस्लॅम विजेती इगा स्वायटेक आणि बेलिंडा बेन्सिक यांनी एकेरीची अंतिम फेरी गाठली आहे.
शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात स्वायटेकने टीचमनचा 6-3, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली. तर बेलिंडा बेन्सिकने पावणेतीन तास चाललेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत अमेरिकेच्या कोको गॉफचे आव्हान 7-6 (7-2), 6-7 (4-7), 6-2 असे संपुष्टात आणले. 19 वषीय स्वायटेक हिने उपांत्य फेरीच्या सामन्यात बेसलाईन खेळावर तसेच वेगवान फटक्मयांवर अधिक भर दिला होता. अमेरिकेच्या गॉफने बेन्सिकला विजयासाठी चांगलेच झुंजविले.