मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी / बेळगाव
बहुचर्चित सीडी प्रकरणाचा बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही. हे प्रकरण आता एसआयटीकडे असल्याने ते चौकशी करत आहेत. तसेच रमेश जारकीहोळी हेही त्या चौकशीला सामोरे जात आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा या निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी स्पष्ट केले आहे.
भाजपतर्फे मंगला अंगडी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते बेळगावात आले होते. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजप निश्चितच बाजी मारेल. कारण दिवंगत सुरेश अंगडी यांचे काम साऱयांनाच माहिती आहे. त्यांनी केंद्रिय रेल्वेराज्यमंत्री झाल्यानंतर बेळगाव-धारवाडसह उत्तर कर्नाटकामध्येही रेल्वेचा विस्तार आणि विकास साधण्यासाठी जे प्रयत्न केले आहेत. ते अत्यंत महत्त्वाचेच आहेत. असे त्यांनी यावेळी सांगितले.
पक्षातर्फे मंगला अंगडी यांना उमेदवारी दिल्यानंतर सर्व कार्यकर्ते त्यांच्या प्रचारासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. तळागाळापर्यंत आमचे कार्यकर्ते गेले आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.