नवी दिल्ली
लक्झरी कार निर्माती कंपनी मर्सीडिझ बेंझ लवकरच आपली डायरेक्ट-टू-कस्टमर सेल्सची योजना कार्यान्वीत करणार आहे. कार कंपनीकडून थेट ग्राहकांपर्यंत पोहचवण्याची नवी योजना राबवण्याचा विचार केला जात आहे. किंमतीबाबत अधिक पारदर्शकता राहावी यासाठी भारतातील लक्झरी कार निर्माती कंपनी मर्सीडिझ बेंझ यांनी कार विक्रीकरीता डायरेक्ट-टू-कस्टमर ही योजना आणली आहे. विक्रेत्याच्या स्तरावर व्यवहार करण्याऐवजी थेट ग्राहकांशी व्यवहार करण्यावर कंपनीचा भर असणार आहे.