A 55-year-old man died in a bull attack in Talwade
तळवडे येथे बैलाच्या हल्यात ५५ वर्षीय तरुणाचा अधिक उपचारासाठी नेताना वाटेतच मृत्यु झाला. हि घटना आज सकाळच्या सुमारास घडली होती शंकर भास्कर राऊळ असे त्याचे नाव आहे त्यांना प्राथमिक उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर गोवा बांबोळी येथे नेत असताना वाटेतच निधन झाले. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आलीआली आहे.
अधिक माहिती अशी की, राऊळ हे आज सकाळी आपल्या मालकीचे बैल घेऊन चरण्यासाठी शेतात गेले होते यावेळी त्यांच्या एका बैलाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला यात त्यांच्या दोंन्ही पायांना गंभीर दुखापत झाली नातेवाईकांनी त्यांना तात्काळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते याठिकाणी प्राथमिक उपचार करुन त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी रुग्णालयात हलविण्यात येत होते मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.