वृत्तसंस्था/ सर्जेव्हो (बोस्निया)
भारताची महिला ज्युडोपटू लिन्थोई चेनामबेमने येथे सुरू असलेल्या विश्व कॅडेट ज्युडो चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून नवा इतिहास घडविला. लिन्थोईने या स्पर्धेत महिलांच्या 57 किलो वजन गटात अंतिम लढतीत ब्राझीलच्या बिनाका रेसचा पराभव करून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
शुक्रवारी या स्पर्धेतील झालेल्या महिलांच्या 57 किलो वजन गटातील अंतिम लढतीत विद्यमान आशियाई विजेती लिन्थोईने ब्राझीलच्या बिनाका रेसचा 1-0 असा पराभव केला. 2022 विश्व कॅडेट ज्युडो चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारी ती पहिली महिला ज्युडोपटू आहे. यापूर्वी या स्पर्धेमध्ये कोणत्याही वयोगटात भारताला सुवर्णपदक मिळालेले नव्हते. भारताच्या टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम (टॉप्स) मध्ये लिन्थोईचा समावेश यापूर्वीच करण्यात आला होता. 2018 साली झालेल्या उपकनि÷ांच्या राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेत तिने पहिल्यांदा सुवर्णपदक मिळविले होते. त्यानंतर 2021 नोव्हेंबरमध्ये चंदिगड राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेत तिने पुन्हा सुवर्णपदक घेतले होते. आशियाई कॅडेट आणि कनि÷ांची ज्युडो चॅम्पियनशीप स्पर्धा 2022 च्या जुलैमध्ये घेण्यात आली होती आणि या स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळविले होते.