सातारा प्रतिनिधी
महाबळेश्वर तालुक्यातील हरोशी येथे कुत्र्यांनी पाठलाग केल्यामुळे घाबरलेले- बिथरलेले सांबर थेट घराच्या छतावरून पत्रा तुटल्यामुळे घरात कोसळून जखमी झाले ही घटना रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली वनविभागास रेस्क्यू टीम पुणे, सह्याद्री प्रोटेक्टर्सच्या प्राणीमात्राच्या सहकार्याने त्याला उपचारांसाठी पुणे येथे घेऊन जाण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की,कुत्र्याने केलेल्या पाठलागामुळे घाबरलेले हे सांबर बचावासाठी हरोशी येथील गणपत कोंडीबा उतेकर यांच्या घराबाजूला असलेल्या दरीवरून घराच्या पत्रावर चढले सांबाराच्या वजनाने सिमेंटचा पत्रा तुटल्याने ते थेट घरामध्ये कोसळून जखमी झाले या सांबाराच्या पायास दुखापत झाल्याने ते उभे राहू शकत नव्हते अचानक आलेल्या या पाहुण्यास पाहून उतेकर परिवार काहीसा घाबरला मात्र या घटनेची माहिती तातडीने वनविभाग वनरक्षक बजरंग वडकर,वनमजूर गणेश वागदरे याना दिली वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने पुणे रेस्क्यू टीमला जखमी सांबार याबाबतची माहिती कळविली सायंकाळी रेस्क्यू टीम सह्याद्री प्रोटेक्टर प्राणीमित्र व वनविभागाच्या कर्म