सातारा प्रतिनिधी
जुनी दाखल केलेल्या केसच्या कारणावरून चिडून जाऊन घरात घुसून कारी येथे एकावर वार केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक नामदेव मोरे, छाया शिवाजी मोरे, शिवाजी एकनाथ मोरे, सुवर्णा अशोक मोरे(सर्व रा.कारी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत सातारा तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कल्याण अण्णा कीर्तन( वय 40) याने दिलेल्या फिर्यादीवरून घरात असताना त्याचा शेजारी राहणारा अशोक मोरे हा शिव्या देत आला. त्यास आम्हाला का शिव्या देतो असे विचारले असता त्याने तुझ्या बायकोने माझ्यावर दोन वेळा केस केली आहे, तुला दावतो असे म्हणत सर्वजण घरात शिवीगाळ करत शिरले. ते पाहून कल्याण हा उठताच त्याच्यावर कोयत्याने कपाळावर वार केला. त्यात तो जखमी झाला. त्याच्या पत्नीलाही मारहाण केली. याचा तपास हवालदार कर्णे करत आहेत.