प्रतिनिधी /बेळगाव
सुप्रसिद्ध अभिनेते व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा मराठा बँकेतर्फे सत्कार करण्यात आला. प्रारंभी बँकेचे माजी चेअरमन बाळासाहेब काकतकर यांनी प्रास्ताविक करून बँकेत निर्माण करण्यात आलेल्या शिवशिल्पाबाबत माहिती दिली. यानंतर डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले.
बँकेचे चेअरमन दिगंबर पवार यांच्या हस्ते डॉ. अमोल कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी बँकेच्या कामगिरीबाबत गौरवोद्गार काढले. बेळगावकरांनी ज्या पद्धतीने शिवरायांची संस्कृती, इतिहास आणि मराठी नाळ जपलेली आहे, याबद्दल आदर व्यक्त केला.
यावेळी म. ए. समिती नेते प्रकाश मरगाळे, माजी महापौर मालोजी अष्टेकर, बँकेचे संचालक एल. एस. होनगेकर, बी. एस. पाटील, एस. एस. खोकाटे, सुनील अष्टेकर, शेखर हंडे, विनोद हंगीरगेकर, मोहन चौगले, रेणू किल्लेकर, नयन मिरजकर, बी. बी. खंडागळे, जयराज मोदगेकर, जनरल मॅनेजर संतोष धामणेकर व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. व्हा. चेअरमन नीना काकतकर यांनी आभार मानले.