ऑनलाईन टीम / तरुण भारत :
नाशिकचे माजी खा. वसंतराव पवार यांच्या कन्या अमृता पवार आज भाजपात प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अमृता यांचा पक्षप्रवेश होणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी प्रदिर्घ काळ एकनिष्ठ असलेल्या या पवार कुटुंबातील अमृता यांचा भाजप प्रवेश अनेकांसाठी धक्कादायक आहे.
अमृता पवार यांच्यासह काँग्रेसचे माजी मंत्री अनंतराव देशमुख आणि त्यांचे पुत्र नकुल देशमुख यांचाही आज भाजपामध्ये प्रवेश होणार आहे. अमृता पवार यांच्या नावे जिल्हा परिषदेच्या देवगाव गटात दहा हजाराहून अधिक मताधिक्याचा विक्रम आहे. स्थानिक नेतृत्वाकडून वारंवार राजकीय कोंडी होत असल्याने अमृता पवार यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पवार आणि देशमुख यांचे भाजप प्रवेश महत्वाचे मानला जात आहेत. एकीकडे भाजप-शिंदे गट आणि दुसरीकडे महाविकास आघाडीतील एकजूट यामुळे नाशिकच्या लोकसभा निवडणुकीत चुरशीचे राजकारण पाहायला मिळणार आहे.
अधिक वाचा : संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना होऊ शकते विनावॉरंट अटक