प्रतिनिधी /बेळगाव
जिजामाता महिला सहकारी बँकेची 49 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंग मंदिर येथे पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यमान चेअरमन ऍड. अश्विनी बिडीकर होत्या.
सभेची सुरुवात दीपप्रज्वलनाने व राजमाता जिजाऊ, संस्थापक अर्जुनराव घोरपडे यांच्या प्रतिमांच्या पूजनाने झाली. सभेसमोर 2021-22 चा ताळेबंद, नफा-तोटा पत्रक संचालिका लीला पाटील व व्यवस्थापक नितीन आनंदाचे यांनी सादर केला. पुढील वर्षाचे अंदाजपत्रक अशोक पाटील यांनी सभेसमोर मांडले. या वर्षाकरिता सभासदांसाठी 20 टक्के लाभांश मंजूर करण्यात आला असून बँकेला 60 लाख 32 हजार 544 रुपये इतका नफा झाला आहे. संस्थेचा एनपीए शून्य टक्के असल्याचे नमुद करण्यात आले.
बँकेच्या कर्मचारी वैष्णवी डोंगरे यांनी ईशस्तवन सादर केले. सूत्रसंचालन साहाय्यक व्यवस्थापक गजानन पाटील यांनी केले. व्यवस्थापक नितीन आनंदाचे यांनी आभार मानले. सभेला व्हा. चेअरपर्सन जयश्री भोसले, संचालिका भाविका होनगेकर, सुचेता भोसले, साक्षी चोळेकर, लता खांडेकर, निला पाटील, रेश्मा जाधव, नंदिता माने, आरती किल्लेकर, मंगल नाईक, श्वेता घाटगे, शशिकला काकतकर यासह बँकेचे कर्मचारी व सभासद उपस्थित होते.