Bhedshi- Raul Maharaj temple will be consecrated
साटेली – भेडशी येथील प. पू. सद्गुरू समर्थ राऊळ महाराज स्मारक मंदिराचा सहावा वर्धापन दिन तसेच प. पू. सद्गुरू अण्णा महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मंगळावर दिनांक 1 नोव्हेंबर ते गुरूवार दिनांक 3 नोव्हेंबरपर्यन्त अनेक भरगच्च कार्यक्रम साटेली भेडशी मधील राऊळ महाराज स्मारक मंदिरात संपन्न होणार आहेत अशी माहिती श्री. प. पू. स. स. राऊळ महाराज सेवा ट्रस्ट पिंगुळी कार्याध्यक्ष विठोबा राऊळ, विश्वस्त राजेंद्र म्हापसेकर, महेंद्र कुडकर, अरविंद कदम, दादा देसाई यांनी पत्रकार परिषदेत आज दिली.
साटेली – भेडशी येथील समर्थ राऊळ महाराज स्मारक मंदिरात ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. सदर स्मारक मंदिरात पुढील 3 दिवसांच्या कार्यक्रमांची जय्यत तयारी सुरू झाली आहे. यावेळी वरील पदाधिकाऱ्यांनी जाहीर केलेली कार्यक्रमांची रूपरेषा पुढीलप्रमाणे.
मंगळवार दिनांक १ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता पिंगुळी येथे महाप्रसाद, दुपारी २ वाजता श्री प.पू. विनायक अण्णा महाराज मूर्ती मिरवणूक, ही मिरवणूक श्री प.पू. राऊळ महाराज समाधीस्थानावरून मार्गस्थ होऊन साटेली-भेडशी येथील स्मारक मंदिर, नंतर तेथील ग्रामदैवत, बाजारपेठ ते पुन्हा स्मारक मंदिर, दुपारी ३:३० वाजता श्री दामोदर बोडगेश्वर दिंडी पथक वास्को गोवा यांचे आगमन, संध्याकाळी ७ वाजता सांज आरती, ७:३० वाजता डिचोली वन ( गोवा ) यांचे समईनृत्य, रात्री ८:३० वाजता पिकुळे येथील सिद्धिविनायक दशावतार नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग होणार आहे.