गुवाहाटी / वृत्तसंस्था
आसाम राज्याची राजधानी गुवाहाटी येथील महानगरपालिकेच्या निवडणुकीत राज्यात सत्ताधारी असणाऱया भारतीय जनता पक्षाने प्रचंड विजय मिळविला आहे. महानगरपालिकेच्या 60 जागांपैकी भाजप आणि त्याचा मित्रपक्ष असणाऱया आसाम गणपरिषदेने तब्बल 58 जागा पटकावून विरोधकांचा धुव्वा उडविला. 9 वर्षांच्या कालखंडानंतर प्रथमच ही मनपा निवडणूक झाली आहे. भाजपने 53 जागा लढवून 52 जागी विजय संपादन केला, तर आगपने 7 जागा लढवून 6 स्थानी विजय मिळविला. काँगेसला एकही जागा मिळू शकली नाही. आपने या महापालिकेत 1 जागा मिळवून खाते उघडले आहे. एजेपीलाही एक जागा प्राप्त झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, आसामचे मुख्यमंत्री हिमांत बिस्व सर्मा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी या विजयासाठी मतदारांचे आभार मानले आहेत.