वृत्तसंस्था/ हैद्राबाद
येथे सुरू असलेल्या प्राईम व्हॉलिबॉल लिग स्पर्धेत चेन्नई ब्लिझ आणि अहमदाबाद डिफेंडर्स यांच्यात सामना होणार असून या सामन्यात चेन्नई ब्लिझचा संघ विजयासाठी प्रयत्न करणार आहे. या स्पर्धेत चेन्नई ब्लिज संघाने या स्पर्धेच्या दुसऱ्या सत्रातील लढतीत मुंबई मेट्रोजचा 4-1 असा पराभव केला होता. चेन्नई ब्लिझ संघातील खेळाडू दर्जेदार असून त्यांची आतापर्यंतची कामगिरी समाधानकारक झाली आहे पण चेन्नई संघाला गेल्या दोन सामन्यात विजय नोंदवता आला नाही. आता ते पुन्हा विजयाच्या मार्गावर येण्यासाठी सज्ज झाले आहेत