ऑनलाईन टीम / तरुण भारत :
क्रिकेटपटू केदार जाधव (Kedar Jadhav) याचे वडील महादेव जाधव हे पुण्यातून बेपत्ता झाले आहेत. कोथरूड पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केदार जाधव हा त्याच्या कुटुंबासोबत पुण्याच्या कोथरूड भागात वास्तव्यास आहे. त्याचे वडील महादेव जाधव हे आज सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडले ते अद्याप परतलेले नाहीत. त्यांचा फोनही बंद लागत आहे. दिवसभरात त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ न शकल्याने केदारच्या कुटुंबियांनी कोथरूड पोलिसात ते बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.