तयारीची लगबग ः खरेदीला ऊत ः शनिवारी पावसाचा व्यत्यय
प्रतिनिधी/ बेळगाव
गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. शिवाय गणेशोत्सवाच्या तयारीची लगबगही दिसत आहे. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा बाजारपेठ विविध साहित्यांनी बहरली आहे. त्यामुळे बाजारात खरेदीला उधाण आल्याचे दिसत आहे. शनिवारी बाजारात खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ वाढली होती.
लाडक्मया बाप्पांचे स्वागत करण्यासाठी शहरवासीय सज्ज झाले असून बाप्पांसाठी लागणाऱया तयारीसाठी धडपड सुरू झाली आहे. कोरोनाच्या संकटानंतर गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी भक्तांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. त्यामुळे बाजारात गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी वर्दळ वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.
गणेशोत्सवाच्या साहित्य खरेदीसाठी शहरातील गणपत गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार, पांगुळ गल्ली, मेणसी गल्ली, बापट गल्ली, कडोलकर गल्ली, काकतीवेस आदी भागात रेलचेल दिसून आली. विशेषतः पूजेचे आणि सजावटीचे साहित्य लायटिंग माळा, थर्माकोलची मखर आदी साहित्यांची मागणी वाढली आहे. याबरोबरच विद्युत रोषणाईच्या माळा, पाईप माळ, एलईडी बल्ब, एलईडी चक्र, दीपमाळ अशा विविध रोषणाईने दुकाने झगमगली आहेत. मात्र, शनिवारी दुपारी झालेल्या पावसामुळे बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. शिवाय पावसाचा व्यत्यय निर्माण झाला. सकाळपासून पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे नागरिक बाजारात दाखल झाले होते. मात्र, दुपारनंतर पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांची निराशा झाली.
गणेशोत्सव जवळ आल्याने बाजारात सजावटीच्या साहित्यांमध्ये विविध रंगांचे ताव, तुरे, हार, फेटे, मुकूट, फुलांच्या माळा, बालचमूंसाठी बंदुकी, फटाक्मयाच्या माळा यासह पूजेच्या साहित्यांनी बाजारपेठ सज्ज झाली आहे. याबरोबरच विविध फळांचीही मागणी वाढली आहे. पूजेसाठी हार, फुलांबरोबर फळांनादेखील महत्त्व असल्याने नारळ, सफरचंद, चिकू, डाळिंब, पेरू, केळी, मोसंबी आदी फळांना मागणी वाढली आहे.
शनिवारी गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी नागरिक मोठय़ा प्रमाणात बाजारात दाखल झाले होते. मात्र, दुपारनंतर आलेल्या पावसामुळे नागरिकांचा हिरमोड झाला. काही नागरिकांना मिळेल ते साहित्य घेऊन माघारी फिरावे लागले. मात्र, रविवारी सुटीचा दिवस असल्याने खरेदीसाठी गर्दी होईल, अशी आशा व्यापाऱयांना आहे.