वृत्तसंस्था/ लखनौ
2022 च्या 16 वर्षांखालील वयोगटातील खेलो इंडिया महिलांच्या हॉकी लीग स्पर्धेचे अजिंक्यपद साई अ संघाने पटकाविले. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात साई अ संघाने प्रितम सिवाच स्पोर्ट्स प्रमोशन फाऊंडेशन संघाचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला.
या अंतिम सामन्यात साई अ संघातर्फे बिनाती मिन्झने 12 व्या मिनिटाला, करुणा मिन्झने 34 व्या मिनिटाला गोल केले. प्रितम सिवाच स्पोर्ट्स प्रमोशनतर्फे रविनाने 40 व्या मिनिटाला एकमेव गोल नोंदविला. विजेत्या साई अ संघाला जेतेपदाबरोबरच पाच लाख रुपयांचे बक्षिस मिळाले. उपविजेत्या प्रितम सिवाच स्पोर्ट्स प्रमोशन फाऊंडेशन संघाला तीन लाख रुपये तर हर हॉकी अकादमीने तिसऱया स्थानासह दोन लाख रुपयांचे बक्षिस मिळविले.