झिंगडीमळ कुर्टी येथे भिंत कोसळून दोन घराची नुकसानी
प्रतिनिधी /फोंडा
राज्यात संततधार सुरू असलेल्या पाऊस व वादळी वाऱयामुळे काल शुक्रवारी फोंडा तालुक्यालाही जबर तडाखा बसला. झिंगडीमळ कुर्टी येथे केंदीय विद्यालयाजवळ भर पावसात एका घराची भिंत दुसऱया घरावर कोसळल्याने दोन्ही घराची जबर नुकसानी झाली. विठ्ठल इंगळे व व्यंकट शेट्टी यांच्या मालकीची घरे असून दोघांचे मिळून रू 1 लाखांची नुकसानी झाल्याची माहिती फोंडा अग्नेशामक दलाने दिली आहे.
फोंडा अग्निशामक दलाने दिवसभरात विविध ठिकाणी रस्त्यावर, वाहनावार व घरावर झाडे कोसळल्याच्या एकूण 14 तक्रारी नोंद केल्या आहेत. त्याशिवाय तिशे बोरी येथील सावकार इस्पितळाजवळील घरात पावसाचे पाणी घुसले यावेळी फोंडा अग्निशामक दलाची टीमने पंपच्या सहाय्याने घरात शिरलेले पाणी बाहेर काढून महत्चाचे सहकार्य केले. तसेच विविध ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते. काही ठिकाणी दोन्ही गावांचा संपर्कही तुटला. फोंडा अग्निशामक दलाचे स्टेशन ऑफिसर सुशील मोरजकर यांच्या मार्गदर्शनाखाली आर एस तलवार, गणेश गावडे, वाय एन गावस, शैलेश खांडेपारकर, गौरेश फडते, वामन गावडे, ए. यू नाईक, यशवंत गावस, गुणुलो परब, बाबुशी गावकर, अनिल बेतोडकर, एन मुली, सी सी मडकईकर, अनिल धाटमुकले, व टीमने महत्वाचे मदतकार्य केले.