छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी : भगवे फेटे, भगव्या पताका, झेंडय़ांमुळे शहरात शिवमय वातावरण
बेळगाव शहरासह उपनगरांमध्ये मोठय़ा उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. शहरात प्रत्येक गल्ल्यांसह चौकाचौकात पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी झाली. भगवे फेटे, भगव्या पताका, झेंडे यामुळे शहरात सर्वत्र शिवमय वातावरण पहायला मिळाले. अंगावर शहारे आणणाऱया पोवाडय़ांनी शिवरायांचा इतिहास शिवभक्तांसमोर मांडला. शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यान येथे पहाटेपासून शिवभक्तांची मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती.
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनामुळे मागील दोन वर्षांमध्ये शिवजयंती होऊ शकली नव्हती. यावर्षी कोरोनाचे निर्बंध मागे घेण्यात आल्याने भव्य स्वरुपात शिवजयंती साजरी झाली. शिवाजी उद्यान येथे महाराजांच्या मूर्तीला आकर्षक फुलांची आरास करण्यात आली होती. ‘जय भवानी, जय शिवाजी’ ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणांनी शिवाजी उद्यान परिसर दणाणून गेला. गल्लोगल्ली, गावोगावी घेऊन जाणाऱया शिवज्योती उद्यानात येत होत्या. मान्यवरांच्या उपस्थितीत शिवरायांच्या मूर्तीचे पूजन झाले.
मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळातर्फे नरगुंदकर भावे चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. अध्यक्ष दीपक दळवी, महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर, माजी महापौर सरिता पाटील, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, प्रवीण रेडेकर, अंकुश केसरकर, श्रीकांत कदम, मालोजी अष्टेकर, गणेश दड्डीकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, संजय किल्लेकर यांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली. भाजप नेते किरण जाधव, रमाकांत कोंडूसकर, माजी जि. पं. सदस्य रमेश गोरल यांच्या हस्ते शिवाजी उद्यानात पूजन करण्यात आले.
धर्मवीर संभाजी चौक येथे शिवज्योतीचे स्वागत
बेळगाव शहर व तालुक्मयातील अनेक मंडळांनी महाराष्ट्रातील गडकोटांवरून शिवज्योत आणल्या आहेत. या शिवज्योतींचे स्वागत धर्मवीर संभाजी चौक येथे केले. मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱयांनी शिवज्योतींचे स्वागत केले. कामत गल्ली, गोवावेस येथील रामलिंगखिंडवाडी, शहापूर कोरे गल्ली, विजयनगर येथील रक्षक कॉलनी, बेनकनहळ्ळी यांसह 25 ते 30 मंडळांच्या शिवज्योतींचे या ठिकाणी स्वागत करण्यात आले.
मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळ, शहापूर विभाग
मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळ, शहापूर विभागाच्यावतीने सोमवारी शिवाजी उद्यान येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. अध्यक्ष नेताजी जाधव यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, श्रीकांत प्रभू, पी. जे. घाडी, हिरालाल चव्हाण यांसह इतर सदस्य उपस्थित होते.
मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळ, अनगोळ विभाग
अनगोळ विभाग मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्यावतीने धर्मवीर संभाजी चौक येथे शिवजन्मोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. सुवासिनींनी पाळणा गायिला. मंडळाचे अध्यक्ष बाळू पवार, माजी नगरसेवक विनायक गुंजटकर, प्रफुल्ल सोमनाचे, राजू पवार, गजानन चौगुले, सागर साळुंखे, योगेश कंग्राळकर, सदानंद लाटूकर, महांतेश हिरेमठ, राजश्री शिंदे, स्मिता झरेकर, ज्योती साळुंखे, श्रद्धा साळुंखे, सुनंदा लाटूकर, उमा चौगुले, राजश्री शिंदे, वैशाली कदम, श्वेता जाधव, शमा मणेरीकर, भारती सूर्यवंशी, संगीता हंजी, निलम शिंदे, अश्विनी सूर्यवंशी, वीणा हावळ, लक्ष्मी जाधव यांसह शिवभक्त उपस्थित होते.
कालिकादेवी युवक मंडळ, बापट गल्ली
बापट गल्ली येथील कालिकादेवी युवक मंडळाच्यावतीने पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. गल्लीतील शुभम मोरे यांनी सपत्नीक शिवमूर्तीचे पूजन केले. यावेळी अंकुश केसरकर, गोपाळ केसरकर, सुनील केसरकर, भाऊ किल्लेकर, महेश पावले, सुनील मुरकुटे, राजेंद्र किल्लेकर, अतुल केसरकर, महेश जाधव, गजानन निलजकर, अमर खणगावकर, अमोल केसरकर, सुबोध केसरकर, अभिषेक निलजकर यांसह शिवभक्त उपस्थित होते.
माळी गल्ली युवक मंडळ
माळी गल्ली येथील युवक मंडळाच्यावतीने सोमवारी शिवजयंती साजरी करण्यात आली. नगरसेविका ज्योती कडोलकर यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. महिलांनी पाळणा म्हटला. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन कडोलकर यांचा मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी महिला मंडळाच्या अध्यक्षा अनुराधा चौगुले, रेश्मा ठोकणेकर, संगीता लंगरकांडे, कल्पना ठोकणेकर, मेघन लंगरकांडे, प्रभाकर बामणेकर, भाऊराव चौगुले, रोहित लंगरकांडे, विकी ठोकणेकर यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवप्रेमी युवक मंडळ सराफ गल्ली, शहापूर
सराफ गल्ली शहापूर येथील शिवप्रेमी युवक मंडळ व मराठा पंच कमिटीच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. महिलांसाठी रांगोळी तर लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यावेळी संतोष बाबली, वैभव लाड, गोविंद लाड, अनिकेत चौगुले, प्रसाद चौगुले, गौरव बाबली, तुषार चौगुले, विलास लाड, रमेश चौगुले, शंकर ताशिलदार, अर्जुन लाड, सुनील बाबली यांसह शिवप्रेमी उपस्थित होते.
मराठा युवक संघ
मराठा युवक संघाच्यावतीने पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते सुहास किल्लेकर, ऍड. नारायण किटवाडकर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी बाळासाहेब काकतकर, शिवाजी हंगिरगेकर, मराठा मंदिरचे माजी अध्यक्ष रघुनाथ बांडगी, कार्याध्यक्ष मारुती देवगेकर, दीनकर घोरपडे, शेखर हंडे, बाबुराव पाटील यांसह मराठा बँकेचे संचालक उपस्थित होते.
शिवजयंती चित्ररथ महामंडळ
शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे सोमवारी छत्रपती शिवाजी उद्यान येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते दुग्धाभिषेक व पुष्पहार अर्पण करण्यात आला. चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. आमदार अनिल बेनके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी चित्ररथ महामंडळाचे सदस्य उपस्थित होते.
गोंधळी गल्लीत शिवजयंती उत्साहात
गोंधळी गल्ली येथे उत्साहाच्या वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात आली. छत्रपती युवक मंडळ व छत्रपती महिला मंडळाच्यावतीने शिवजयंती साजरी झाली. नगरसेवक शंकर पाटील यांच्या हस्ते शिवमूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी पाळणा व पोवाडा सादर करण्यात आला. ढोल-ताशाच्या गजरात शिवजयंती साजरी झाली.
पाटील गल्ली, वडगाव
पाटील गल्ली, वडगाव येथील शिवजयंती मंडळातर्फे शिवजयंती साजरी करण्यात आली. गल्लीतील महिलांनी पाळणा म्हटला तर मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष सोमनाथ पाखरे, उपाध्यक्ष प्रसाद जुवेकर, विजय पाटील, सिद्दनाथ नलवडे, राम बाळेकुंद्री, मंथन पाखरे, रोहित हलगेकर, विशाल हलगेकर, गीता हलगेकर, संगीता हलगेकर, रिया जुवेकर, पूजा जुवेकर यांसह शिवभक्त उपस्थित होते.
रामामेस्त्राr अड्डा, कपिलेश्वर रोड
बाल शिवाजी युवक मंडळ, रामामेस्त्राr अड्डा, कपिलेश्वर रोड येथे शिवजयंती मोठय़ा जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी अध्यक्ष श्रीधर देसाई, उपाध्यक्ष राकेश पोटे व मंडळाचे कार्यकर्ते व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
सोनार गल्ली, वडगाव
वडगाव येथील सोनार गल्ली उत्सव मंडळाच्यावतीने सोमवारी शिवजयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गल्लीतील महिला मंडळ, युवक मंडळ व शिवभक्त उपस्थित होते.
एकदंत युवक मंडळ, समर्थनगर
समर्थनगर येथील एकदंत युवक मंडळ विनायक मार्ग यांच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. महिलांनी टाळ-मृदंगाच्या गजरात पाळणा म्हटला. भाजीमार्केट येथील विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळाचे भजन झाले. यावेळी गल्लीतील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला शिवभक्त मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
रामदेव गल्ली, वडगाव
रामदेव गल्ली, वडगाव येथील सरस्वती महिला मंडळाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते शिवमूर्तीचे पूजन करण्यात आले. माजी महापौर आप्पासाहेब पुजारी व माजी उपमहापौर मधुश्री पुजारी यांच्यासह श्रीराम युवक मंडळ व सरस्वती महिला मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
महागणपती युवक मंडळ, शहापूर
लक्ष्मी रोड शहापूर येथील महागणपती युवक मंडळ व सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते शिवमूर्तीचे पूजन करण्यात आले. महिलांनी पाळणा म्हटला. यावेळी गल्लीतील महिला, युवक व नागरिक उपस्थित होते.
नवहिंद युवक मंडळ, बापट गल्ली
बापट गल्ली येथील नवहिंद युवक मंडळाच्यावतीने मोठय़ा उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते पूजन झाले. गल्लीतील महिलांनी पाळणा म्हटला. नागनाथ मठाचे स्वामी विनय काकती व बुडाचे अध्यक्ष संजय बेळगावकर, भाजप महिला अध्यक्षा शिल्पा केकरे यांसह गल्लीतील पंचमंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजप नेते किरण जाधव यांच्याकडून शिवमूर्तीचे पूजन
विमल फौंडेशनचे अध्यक्ष व भाजप कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे सचिव किरण जाधव यांच्यावतीने सोमवारी शहापूर येथील शिवाजी उद्यान येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. सकल मराठा समाजाचे सदस्य व शिवप्रेमींच्या उपस्थितीत शिवमूर्तीचे पूजन करण्यात आले.
बेळगावसह परिसरात मोठय़ा उत्साही वातावरणात सोमवारी पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी झाली. भाजप नेते किरण जाधव यांच्या उपस्थितीत शहरातील विविध ठिकाणी शिवजयंती साजरी झाली. शिवाजी महाराजांचे विचार घेऊन पुढील पिढीने कार्यरत राहावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी भाजपचे सदस्य व सकल मराठाचे कार्यकर्ते उपस्थित
होते.
नवक्रांती मंडळातर्फे शिवमूर्तीचा आगमन सोहळा थाटात : गजराज ढोल ताशाच्या तालावर मिरवणुकीत रंगत
अनगोळ, नाथ पै नगर येथील नवक्रांती युवक मंडळाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचा आगमन सोहळा पार पडला. त्यानंतर मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून शंकरगौडा पाटील, गुंडू मास्तमर्डी, माजी नगरसेवक मोहन भांदुर्गे, विनायक गुंजटकर, राजू पवार, सतीश जाधव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
धर्मवीर संभाजी चौक, रघुनाथ पेठ, जय महाराष्ट्र चौक, भांदूर गल्ली, नाथ पै नगरपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. गजराज ढोल-ताशा पथकाच्या तालावर मिरवणुकीला रंगत आली. या मिरवणुकीमध्ये सजविलेल्या बैलजोडय़ा सामील झाल्या होत्या. तरुणांबरोबरच महिलांनीही आपला सहभाग यामध्ये दर्शविला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन ठिकठिकाणी करण्यात आले. मूर्तीला पुष्पहार अर्पण करून जयघोष करण्यात आला.
या कार्यक्रमाला अण्णासाहेब गुंडप्पण्णावर, दीपक सोमनाचे, चेतन बुद्धण्णावर, नंदू कंग्राळकर, वैभव खाडे, टिळकवाडी पोलीस स्थानकाचे अधिकारी मणिकांत पुजारी, संतोष दलवाई, बी. वाय. बांडगी, लक्ष्मण देमजी, परशराम भांदुर्गे तसेच गल्लीतील पंच मंडळी उपस्थित होती.