गोवा प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर यांची माहिती
प्रतिनिधी /पणजी
‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात दम नसून विनाकारण खोटे आरोप ठेवून एफ्ढआयआर नसताना राहुल, सोनिया गांधी विरोधात समन्स बजावले आणि दिल्लीतील काँगेस कार्यालयात घुसून पोलिसांनी अलोकशाही पध्दतीने पक्षाच्या नेत्यांना ताब्यात घेतले म्हणून गोवा प्रदेश काँगेस अध्यक्ष अमित पाटकर व इतर नेत्यांनी भाजप केंद्र सरकारचा कडक शब्दात निषेध केला आहे.
या प्रकरणी राष्ट्रीय स्तरावर आज गुरूवार दि. 16 जून रोजी प्रत्येक राज्यातील राजभवनजवळ सकाळी 11 वाजता काँग्रेस पक्षातफ्xढ धरणे, निदर्शने करून निषेध नोंदवण्यात येणार असल्याची माहिती अमित पाटकर यांनी दिली. पणजी दोनापावला येथेही निषेध नोंदविला जाणार असल्याचे ते म्हणाले.
पणजीत बुधवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पाटकर यांनी ही माहिती दिली. नॅशनल हेराल्डची कोणतीही संपत्ती, मालमत्ता गांधी कुटुंबाकडे स्थलांतरीत करण्यात आलेली वा झालेली नाही. तशी ती असती तर दोघांच्याही निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी तशी माहिती दिली असती. निवडणूक आयोगाने तर या प्रकरणत काहीच तथ्य नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट केल्याचे पाटकर यांनी सांगितले.
जनतेचे लक्ष विचलित करण्याचा डाव
जनतेचे लक्ष विचलित करून काँगेस पक्षाला बदनाम करण्याचा हा डाव असून केवळ राजकीय स्वार्थ त्यामागे दडलेला आहे. घाणेरडे राजकारण खेळण्यासाठीच भाजपने हा डाव रचला असून हे केवळ सुडाचे राजकारण असल्याचा आरोप पाटकर यांनी केला आहे.
दिल्लीत काँगेस नेत्यांना, पदाधिकाऱयांना तसेच महिला खासदार, कार्यकर्त्यांना पुरूष पोलिसांनी वाटेल तसे ओढून नेले. कार्यालयात जाण्यास मनाई केली हा सर्व प्रकार केंद्रातील भाजप सरकारसाठी अशोभनीय असून पंतप्रधान, गृहमंत्री यांनी त्याचे उत्तर द्यावे अशी मागणी पाटकर यांनी केली.