नेपाळच्या बाजुरामध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्ली-एनसीआरमध्ये बुधवारी दुपारी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ होता. बाजुरा येथे बुधवारी दुपारी 1.45 च्या सुमारास 5.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची माहिती नेपाळच्या राष्ट्रीय भूकंप निरीक्षण आणि संशोधन केंद्राने दिली. या आपत्तीमध्ये कुठेही मोठी पडझड किंवा हानी झाल्याचे वृत्त नाही. नेपाळमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. यापूर्वी 24 जानेवारीला नेपाळमध्ये 5.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. तसेच मागील वषी नोव्हेंबरमध्ये 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली होती.
गेल्या अनेक दिवसांपासून भारतातील अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. नुकतेच गुजरातमधील कच्छ, सिक्कीम, आसाम आणि दिल्लीतही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आता अनेक नवीन अभ्यासांनी लोकांना भूकंपाची माहिती दिली आहे. तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे संपूर्ण जगात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.