19 लाख रुपयांचे आईस्क्रिम, 9 लाख रुपयांचा पिज्जा, पोटॅटो फ्राईजची किंमत 15 हजार रुपये हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटणे साहजिकच आहे. फास्ट फुडचा सम्राट मानली गेलेली कंपनी प्रेंच फ्राईजने हा विक्रम केलेला आहे. न्यूयॉर्कमधील एका रेस्टॉरेंटमध्ये अशा प्रकारचे दर आहेत. येथे एक प्लेट फ्रेंचफ्राईजची किमंत 200 डॉलर्स अर्थात 15 हजार रुपये इतके आहे.
या अतिप्रचंड किंमतीमुळे या डिशचे नाव 2021 मध्ये गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाले आहे. प्रेंच फ्राईजची किमत इतकी कशी? हा प्रत्येकाला पडणारा प्रश्न आहे. असे म्हटले जाते की या रेस्टॉरेंटमध्ये काम करणारा शेफ (स्वयंपाकी) सोन्याच्या भुकटीचा शिडकावा करून हे प्रेंच फ्राईज बनवितो. यासाठी अतिशय उच्चप्रतिच्या बटाटय़ाचा उपयोग केला जातो. याशिवाय व्हिंटेज शॅम्पेन, ब्लॅक फ्रेंच शॅम्पेन व्हिनेगार, ट्रफल सॉल्ट, ट्रफल ऑईल, विशेष प्रकारचे चीज इत्यादींचा उपयोग हे प्रेंच फ्राईज बनविण्यासाठी केला जातो. याच जगप्रसिद्ध रेस्टॉरेंटमध्ये संपूर्ण जगाला हैराण करून सोडणाऱया आणखी एका विक्रमाची नोंद आहे. हा विक्रम म्हणजे 19.8 लाख रुपयांचे आईस्क्रिम हा आहे. ही कोणत्याही पदार्थाचा विचार करता ही जगातील सर्वात महागडी डीश आहे. या शिवाय 9 लाख रुपयांचा पिझ्झाही या रेस्टॉरेंटमध्ये मिळतो. आपल्यासारख सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न एवढाच की हे सर्व खातो तरी कोण? आणि कशासाठी?