सेन्सेक्स 479 अंकांनी मजबूत ः युरोपीयन बाजार तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
देशातील भांडवली बाजारात मागील तीन सत्रात सलगच्या राहिलेल्या घसरणीला अखेर बुधवारी पूर्णविराम मिळाला असल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये बीएसई सेन्सेक्स जवळपास 478.59 अंकांनी मजबूत स्थितीत .राहिला होता. विविध घडामोडींमध्ये युरोपीयन बाजारात सकारात्मक स्थिती राहिल्याने यावेळी बँकिंग, ऊर्जा आणि माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागात लिलाव राहिल्याने बाजारात तेजी राहिली असल्याचे अभ्यासकांनी सांगितले आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने दिवसअखेर सेन्सेक्स 478.59 अंकांनी वधारुन निर्देशांक 57,625.91 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी 140.05 अंकांनी वधारुन निर्देशांक 17,123.60 वर बंद झाला.
जागतिक पातळीवरील घडामोडींमध्ये आशियातील बाजारात दक्षिण कोरियाचा कोस्पी आणि चीनचा शांघाय कम्पोझिट लाभासह बंद झाला तर जपानचा निक्की आणि हाँगकाँगचा हँगसेंग हा नुकसानीसह बंद झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यामधील युरोपमधील मुख्य बाजार प्रारंभीच्या दरम्यान तेजीत राहिला होता. याचवेळी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 0.39 टक्क्यांनी वधारुन 94.64 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे.
दिवसभरात प्रमुख कंपन्यांमध्ये पॉवरग्रिड कॉर्प, ऍक्सिस बँक, एनटीपीसी, इंडसइंड बँक, लार्सन ऍण्ड टुब्रो आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे समभाग मुख्यपणे लाभात राहिले होते. अन्य कंपन्यांमध्ये एशियन पेन्ट्स, भारती एअरटेल, टायटन आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रिज, हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन, कोटक महिंद्रा बँक आणि लार्सन टुब्रो यांनी तेजी राखत बाजाराला चांगला आधार दिला आहे. बँक निफ्टी निर्देशांक 1 टक्के इतका चढला होता. सध्याला आयटी कंपन्यांचे तिमाही अहवाल सादर होत असून त्याचा परिणाम शेअर बाजारावर आगामी काळात सकारात्मक दिसू शकतो.