वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात 10 मार्च 2023 रोजी संपलेल्या आठवड्यात 2.39 अब्ज डॉलरची घट झाल्याची नोंद झाली आहे. सध्या विदेशी चलनसाठा 560 अब्ज डॉलरपर्यंत खाली आला असून तो गेल्या 3 महिन्यांतील नीचांकी आहे. यापूर्वी, 3 मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलनसाठा 1.46 अब्जच्या वाढीसह 562.40 अब्ज डॉलर्सवर होता. 10 मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात देशाच्या सोन्याच्या साठ्यातही घट झाली आहे. या कालावधीत ते 11 कोटी डॉलरने कमी होऊन 41.92 अब्ज डॉलरवर पोहोचले आहे.