सांगली,प्रतिनिधी
महापालिकेने तयार केलेल्या सह्याद्रीनगरच्या गणेश मुर्ती दान केंद्रावर सोपवलेल्या सुंदर पार्क येथील नागरिक विलास काळे यांच्या मुर्तीवरील विसरलेला चांदीचा मुकूट मुर्तीकार संजय पाटील आणि मनपा कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे परत केला आहे. मुकुटाची अंदाजे किंमत ११ हजार आहे.
मुकुट विसरल्याचे काळे यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी महापालिका मूर्तीदान केंद्रावर संपर्क साधला. यावेळी मनपाने ज्या मुर्तीकारांकडे मुर्ती दान झाली होती त्या संजय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता मुकुट सुरक्षीत असल्याचे त्यांनी कळवले. रविवारी तो चांदीचा मुकुट मनपाच्या कर्मचाऱ्यांनी परत केला. मनपा प्रशासनाने मुर्तीकार आणि कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहेत.