बेळगाव : रथसप्तमीनिमित्त जागतिक सूर्यनमस्कार अंतर्गत आयोजित सूर्यनमस्कार अनगोळ येथील संत मीरा शाळेच्या क्रीडांगणावर मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पतंजली उत्तर कर्नाटक राज्य प्रभारी किरण मˆाsळकर, जगजंपी बजाजचे संचालक मल्लिकार्जुन जगजंपी, डॉ. सुनील भांदुर्गे, अर्जुन पुरस्कार विजेते मुकुंद किल्लेकर, पुऊषोत्तम पटेल, मोहन बागेवाडी, जोतिबा भादवणकर, अमरेंद्र कानगो, अशोक बेणकर, श्वेता दीक्षित आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी हनुमान प्रतिमेचे व भारतमातेचे पूजन करून या उपक्रमाला सुऊवात करण्यात आली.
पाहुण्यांचा परिचय विश्वास पवार यांनी करून दिला. या उपक्रमाला परिसरातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सूर्यनमस्कारामुळे परिसरातील नागरिक व महिला यावेळी उपस्थित होत्या. संत मीरा, बालिका आदर्श, एम. आर. भंडारी, ठळकवाडी हायस्कूल, जी. जी. चिटणीस, गोमटेश शाळेच्या विद्यार्थ्यांनी या सूर्यनमस्कार कार्यक्रमात सहभाग घेतला. सूत्रसंचालन परशराम मंगनाईक यांनी केले.