ऑनलाईन टीम/तरुण भारत
माढा तालुक्यातील ग्लोबल टीचर रणजीतसिंह डिसले (Ranjitsinh Disale) यांचा जिल्हा परिषदेच्या शिक्षक पदाचा राजीनामा दिला आहे. माढा गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे डिसले गुरुजींनी राजीनामा सुपूर्त केला आहे. प्राथमिक शिक्षण अधिकारी किरण लोहार यांच्याकडे हा सात जुलै रोजी राजीनामा पाठविण्यात आला. शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. डिसले गुरुजी यांनी आपल्या पदाचा राजीनामा हा ७ जुलै रोजीच दिला होता.
अमेरिकेतील फुलब्राइट संस्थेची शिष्यवृत्ती घेऊन पुढील शिक्षणासाठी 8 ऑगस्ट रोजी रवाना होण्याआधी डिसले गुरुजींनी राजीनामा दिला. रणजीत सिंह डिसले यांनी क्यू क्युआर कोड प्रणाली विकसित केल्यानंतर त्यांना प्रतिष्ठेचा समजला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर सर्व स्तरातर अभिनंदनचा वर्षाव झाला होता.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेकडून शिक्षक म्हणून रणजीतसिंह डिसले यांची नियुक्ती केली होती. मात्र नियुक्त केलेल्या जागेवर डिसले गुरुजी हे रुजू नव्हते. अशी तक्रार शिक्षण विभागाकडे करण्यात आली होती. प्राथमिक शिक्षण अधिकारी किरण लोहार यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून डिसले गुरुजींवर कारवाई करावी अशी शिफारस जिल्हा परिषद मुख्य अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे करण्यात आली होती.
हे ही वाचा : गुजरात एटीएसची मोठी कारवाई, मुंद्रा बंदरातून ३५० कोटीचे ड्रग्ज जप्त
डिसले गुरुजी यांना अमेरिकेतील फुलब्राइट संस्थेची शिष्यवृत्ती मंजूर झाली होती. त्यासाठी डिसले गुरुजी यांनी जिल्हा परिषदेकडे पुढील शिक्षणासाठी रजा मागितली होती. मात्र रजेचा विषय तत्कालीन शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यापर्यंत जाऊन पोहोचला होता. त्यांच्या मध्यस्थीनंतर रणजीत गुरुजी यांना रजा मंजूर करण्यात आली होती. अमेरिकेतील फुलब्राइट संस्थेची शिष्यवृत्ती घेऊन आठ ऑगस्ट रोजी रवाना होणार होती मात्र त्याआधीच डिसले गुरुजी यांनी आपल्या शिक्षक पदाचा राजीनामा दिला आहे. शिक्षण विभाग बाबत काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे