वृत्तसंस्था/ भुवनेश्वर (ओडिशा)
येथील बिजू पटनाईक जलतरण तलावात सुरु झालेल्या 48 व्या कनिष्ठांच्या जलतरण स्पर्धेत कर्नाटकाच्या रिधीमा विरेंद्रकुमारने महिलांच्या गट एक 100 मी. बॅकस्ट्रोकमध्ये नव्या स्पर्धा विक्रमांसह सुवर्णपदक पटकाविले.
या स्पर्धेत 100 मी. बॅकस्ट्रोकमध्ये कर्नाटकाच्या रिधीमाने 1 मिनिट, 04.96 सेकंदाचा अवधी घेत नव्या स्पर्धा विक्रमांसह सुवर्णपदक मिळविताना 2015 साली या स्पर्धेत माना पटेलने नोंदविलेला 1 मिनिट, 05.00 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. या क्रीडाप्रकारात संजना प्रभुगावकरने रौप्यपदक तर निना व्यंकटेशने कांस्यपदक पटकाविले. मुलांच्या गट दोन 100 मी. बॅकस्ट्रोकमध्ये तेलंगणाच्या सुहास एम. ने 1 मिनिट, 01.29 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक तर कर्नाटकाच्या ईशान मेहराने रौप्यपदक व हरियानाच्या जैनने कांस्यपदक मिळविले.