मान्यवरांनी सोसायटीच्या कार्याची केली विशेष प्रशंसा
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगावस्थित मराठा लाईट इन्फंट्रीच्या पुनर्मिलन सोहळय़ासाठी आलेले निवृत्त ब्रिगेडियर रणजीत मिश्रा, निवृत्त ब्रिगेडियर संजय होले, निवृत्त ब्रिगेडियर के. जी. मेनन यांनी लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या कॉर्पोरेट ऑफिसला सदिच्छा भेट दिली.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अजित गरगट्टी यांनी सर्वांचे स्वागत केले. उपस्थित सर्व लष्करी अधिकाऱयांचा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी निवृत्त ब्रिगेडियर श्रीखंडे, निवृत्त कर्नल मोहन काकतीकर, निवृत्त कर्नल गिरीश उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी लोकमान्य सोसायटीच्या प्रगतीचे कौतुक करून संस्थेबद्दल गौरवोद्गार काढले. विशेषतः लष्करी अधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांना दिलेल्या सेवेबद्दल लोकमान्य सोसायटीच्या कार्याची विशेष प्रशंसा केली.
या प्रसंगी लोकमान्य सोसायटीचे सीईओ अभिजित दीक्षित, समन्वयक विनायक जाधव व सीएसओ निवृत्त कर्नल दीपक गुरुंग उपस्थित
होते.