दुधसागर कालोत्सवात वाहतूक सुरळीत करण्यात मोलाचा वाटा
प्रतिनिधी /धारबांदोडा
कुळे पोलीस स्थानकात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले संजय दळवी यांची तडकाफडकी बदलीचे आदेश जारी झाल्यामुळे येथील कुळे-शिगांव भागातील नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
निरीक्षक संजय दळवी मागील वर्षभरापुर्वी कुळे पोलीस स्थानकात रूजू झाले हेते. त्यांनी अगदी कमी अवधीत दुर्गम भागात वसलेल्या कुळे परिसरात कायदा व सुव्यवस्था निर्माण करण्यात चोख भूमिका बजावलेली आहे. जागतिक पर्यटन स्थळ म्हणून नावाजलेल्या दुधसागर पर्यटन क्षेत्र असो किंवा दुधसागर देवाच्या वर्धापनदिन, कालोत्सवात वर्षानुवर्षे होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यात उपाय सुचविला होता. सुरळीत वाहतूकीसाठी उपजिल्हाधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बैठक घेत यावर प्रभावी तोडगा काढण्यात महत्चाची भुमिका बजावली होती.
राज्यात अनेक ठिकाणी काही ठरावीक पोलीस स्थनाकात कित्येक वर्षे ठाण मांडून बसलेले पोलीस निरीक्षक असे चित्र दिसत असताना कुळे भागातील नागरिकाचे प्रश्न सोडविण्यात नेहमी तत्पर राहणाऱ्या अधिकाऱ्याचे केवळ एक वर्षाच्या काळानंतरच सुरक्षा विभाग पणजी येथे तडकाफडकी बदलीचे आदेश जारी झाल्यामुळे येथील नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत.