वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
डीजीसीए (नागरि उड्डाण संचलनालय) यांनी जेट एअरवेजला हवाई सेवा सुरू करण्यासंदर्भात प्रमाणपत्र जारी केल्याने कंपनीला आता आपली विमान सेवा पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू करता येणार आहे.
डीजीसीएकडून जेट एअरवेजला एअरऑपरेटर सर्टिफिकेट नुकतेच प्रदान करण्यात आले. या अनुषंगाने कंपनी आता आपल्या व्यावसायिक विमानसेवेला प्रारंभ करू शकते.
जालान-कॉलरॉक कॅपिटलकडे नेतृत्व
युएईमधील व्यावसायिक मुरारीलाल जालान आणि ब्रिटनमधील कॉलरॉक कॅपिटल यांनी जून 2021 मध्ये राष्ट्रीय कंपनी कायद लवादाकडे अर्ज करत कंपनीबाबतची बोली जिंकली होती. त्यामुळे यांच्याकडेच आता कंपनीची धुरा राहणार आहे.
तीन वर्षांनंतर पुन्हा प्रारंभ
मागच्या 5 मे ला जेट एअरवेजने हैद्राबाद ते दिल्ली अशी विमानफेरी केली होती. सदरची सेवा ही साधारण तीन वर्षांनंतर पुन्हा सुरू करण्यात आली. 2019 मध्ये कंपनी दिवाळखोरीत निघाली होती. त्यामुळेच त्यानंतरच्या काळात विमानसेवा बंद झाली होती. 17 एप्रिल 2019 रोजी शेवटचे कंपनीचे शेवटचे विमान झेपावले होते.