वेंगुर्ला / प्रतिनिधी-
राज्याचे शिक्षणमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच वेंगुर्ले दौऱ्यावर आलेल्या दिपक केसरकर यांनी येथील ग्रामदैवत श्री देव रामेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दाजी परब व सचिव रविद्र परब यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या सत्कार प्रसंगी संजय परब, वासुदेव परब, निखिल घोटगे, प्रथमेश गुरव, सचिन वालावलकर, सुहास मांजरेकर, नितीन मांजरेकर, गणपत केळुसकर, जयू हळदणकर आदी उपस्थित होते.