सुहाना खान अन् अगस्त्या नंदाही झळकणार
शाहरुखची मुलगी सुहाना खान, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्या नंदा आणि खुशी कपूरचा पदार्पणातील चित्रपट ‘द आर्चीज’चे चित्रिकरण सुरू झाले आहे. चित्रपटाच्या निर्मात्या रीमा कागती यांनी सोशल मीडियावर यासंबंधी माहिती दिली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन झोया अख्तर करत असून सह-निर्मात्या देखील आहेत. हा चित्रपट कॉमिक सीरिजवर आधारित असेल.
रीमाने इन्स्टाग्रामवर द आर्चीजच्या पहिल्या शॉटचे डिटेल्स देत एका क्लॅपबोर्डाचे छायाचित्र शेअर केले आहे. फरहान अख्तरने चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. अगस्त्या चित्रपटात आर्ची ऍन्ड्रय़ूजची भूमिका साकारताना दिसून येणार आहे. तर खुशी आणि सुहाना कॉमिकमधील अन्य व्यक्तिरेखा बेट्टी आणि व्हेरोनिकाच्या भूमिकेत दिसून येतील.
झोयाने या चित्रपटाची घोषणा नोव्हेंबर महिन्यात केली होती. परंतु अद्याप त्यांनी चित्रपटातील कलाकारासंबंधी अधिकृत माहिती देलेली नाही. चित्रपटाचे चित्रिकरण उटी आणि परिसरातील हिल स्टेशन्समध्ये पार पडणार आहे. या चित्रपटातून तीन स्टारकिड पदार्पण करणार असल्याने याची मोठी चर्चा सुरू आहे.