तिसऱया दिवशीच्या सकाळच्या सत्रातील स्थिती ः दुसऱया दिवशी 100 टक्के प्रतिसाद
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
एलआयसी आयपीओला गुंतवणूकदारांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. शुक्रवारी तिसऱया दिवशी सकाळच्या कालावधीपर्यंत 1.19 पट सबस्क्राईब झाला आहे. दुसऱया दिवशी गुरुवारी हाच प्रतिसाद 100 टक्के मिळाला आहे. आतापर्यंत 19.22 कोटी समभागांसाठी बोली प्राप्त झाली आहे.
पॉलिसीधारकांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या कोटय़ात 3.59 पट, तर कर्मचाऱयांसाठी 2.70 पट आणि रिटेल गुंतवणूकदारांचा हिस्सा हा 1.09 पट सबस्क्राइब झाला आहे.
अन्य घडामोडी
w पॉलिसीधारक असणाऱया हिस्स्यातून तीन पटपेक्षा काहीसा अधिक प्रतिसाद मिळाला
w तर कर्मचाऱयांसाठी आरक्षित असणाऱया हिस्स्याला 2.21 पट प्रतिसाद मिळाला
w किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आरक्षित 6.9 कोटी समभाग श्रेणीत दुसऱया दिवशी जवळपास 93 टक्के प्रतिसाद मिळाला आहे.