साबण, क्रीम पावडरसह अन्य उत्पादनांचा समावेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतामधील सर्वात मोठा एफएमसीजी ब्रँड असणारा हिंदुस्थान युनिलिव्हर(एचयूएल) यांनी 5 मे पासून आपल्या उत्पादनांच्या किमती जवळपास 15 टक्क्यांपर्यंत वाढविल्या आहेत, अशी माहिती मीडिया अहवालामधून देण्यात आली आहे. यामध्ये पियर्स साबणाची 125 ग्रॅम साबणाची किमत ही 2.4 टक्के आणि मल्टीपॅकमध्ये 3.7 टक्के किमत वाढविल्या असल्याचे सांगितले आहे.
यामध्ये लक्स साबण किमत 9 टक्के तर शाम्पूची किमत 8 ते 10 रुपयांपर्यंत वाढविली आहे. यामध्ये विविध ब्रँडचा समावेश असल्याचेही म्हटले आहे. यासोबतच स्क्रिन क्रीम ग्लो ऍण्ड लव्हलीच्या किमती 6 ते 8 टक्क्यांनी वाढणार असून तोंडाला लावायची पावडरही 5 ते 7 टक्क्यांनी महागणार आहे.
या अगोदर मार्चमध्ये केली होती दरवाढ
याच्या अगोदर म्हणजे चालू वर्षातील मार्च महिन्यात हिंदुस्थान युनिलिव्हर आणि नेस्ले यांनी मॅगी, चहा, कॉफी आणि दूध यांची किमत 14 मार्च रोजी वाढविली होती. तेव्हा ब्रू कॉफीच्या किमती 3 ते 7 टक्के, ब्रू गोल्ड कॉफी 3 ते 4 टक्के, इंस्टंट कॉफी पाउचच्या किमती 3 टक्क्यासह 6.66 टक्क्यांपर्यंत वाढविले होत्या.
30 वर्षांमध्ये अशी महागाई पाहिली नव्हती ः सीईओ मेहता
2 मे रोजी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये हिंदुस्थान युनिलिव्हरचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक संजीव मेहता यांनी म्हटले होते, की. ‘मागील 30 वर्षांच्या कालावधीत या प्रकारची महागाई मी तरी पाहिली नाही.’