पर्वरी : गोव्याच्या देवभूमीत बेती गोवा येथे 108 यज्ञ कुंडांचा महाशिवयाग भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला. प.पू. सदगुरू गावडे काका महाराज यांच्या संकल्पनेतून व श्री स्वामी समर्थ श्रद्धा भक्त सेवा न्यास, यांच्या आयोजनातून करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गोवा राज्याचे पर्यटनमंत्री रोहन खवटे, आमदार केदार नाईक, गोवा राज्य भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, सरपंच स्वप्निल चोडणकर, उपसरपंच दीपाली वेर्णेकर, जि. पं. सदस्या बांद श्वेता कोरगावकर, राजू राऊळ, अध्यक्ष अमीत कोरगावकर, सचीव गिरीधर गावडे उपस्थित होते. केद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांनी अध्यात्म हिच सगळ्यात मोठी शक्ती आहे, असे सांगितले. पर्यटन मंत्री रोहन खंवटे यानी समाजाला योग्य मार्ग दाखविण्यासाठी योग्य गुरुची आवश्यकता असते. हाच भक्ती मार्ग गोव्यात रुजविण्यासाठी सदगुरू श्री गावडेकाका महाराज यांनी घेतलेला पुढाकार आम्हा सर्व गोवावासीयांसाठी मोठा आशीर्वाद आहे, असे सांगितले. अशा प्रकारच्या एकाच वेळी 108 यज्ञ कुंडांच्या महाशिवयागात प्रत्यक्ष प्रथमच सहभागी होण्याचे भाग्य आपल्याला लाभले, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी या शिवमहायागाच्या पूर्वसंध्येला भेट देऊन श्री स्वामी समर्थाच्या पादुकांचे पूजन केले. 25 देशात प्रसिद्ध असलेले केरळ राज्यातील पुरोहित जीत लंबोदरी त्याच्या सोबत असलेल्या पुरोहितांनी मंत्र घोषात हा महाशिवयाग संपन्न केला. सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत धार्मिक, विधीवत याग संपन्न झाला. सर्वांचे कल्याण होण्यासाठी प्रार्थना करण्यात आली.गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र राज्यातील हजारो स्वामी भक्तांना या सोहळ्याचा लाभ घेतला. श्री श्री 108 महंत प.पु. सदगुरू श्री गावडे काका महाराज यांनी अमृततुल्य असे मार्गदर्शन केले. भक्ती मार्ग हाच खरा मुक्ती मार्ग आहे. स्वामी सेवेत निरंतर रहा. आपणा सर्वांना मिळून एक वर्षात येथील सकंल्पित स्वामी मदिर पुर्ण करायचे आहे. यावेळी या मंदिरासाठी आपल्या स्वमालकीची जमीन दान देणाऱ्या नाईक मिरसंकर कुटुंबीय, पुरोहीत जीत लंबोदरी, जि. प. सदस्या श्वेता कोरगावकर, राजू राऊळ, प्रीती कुशे, विनायक परब (वास्तु विषारद), एकनाथ गावडे, राजन गावडे, बापू गावकर, बंड्या सावंत आदींना सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक व आभार श्री सदगुरू भक्त सेवा न्यासचे सचिव राकेश केसकर यान्ंााr मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश अवखळे, अनुपा पार्सेकर यांनी केले.
Previous Articleजवळच्या लोकांकडूनच महिलांना अधिक धोका
Next Article शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष होणे नाही
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.