व्यवस्थापन कोटा प्रवेशाला प्रारंभ :
वार्ताहर / मच्छे
अभियांत्रिकी अभ्यासक्रमांपैकी कॉम्प्युटर सायन्स अभ्यासक्रमाला मागणी वाढली आहे. व्यवस्थापन कोटा भरण्याची प्रक्रिया आतापासूनच सुरू झाली असून विद्यार्थी कॉम्प्युटर सायन्स (सीएस) ला प्राधान्य देत आहेत. यासोबत आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि मशीन लर्निंग (एमएल) सारख्या नवीन तंत्रज्ञान अभ्यासक्रमांनाही मागणी वाढली आहे.
राज्यात विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठ (व्हीटीयू) अंतर्गत 205 अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. दरवर्षी 70 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना त्यामध्ये प्रवेश मिळतो. नवीन अभ्यासक्रमांच्या मागणीमुळे उच्चशिक्षण विभागाने प्रवेश वाढविला होता. अशाप्रकारे 2021-22 मध्ये संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीच्या 12,423 जागा 2022-23 मध्ये 13,772 पर्यंत म्हणजेच 1,349 जागा वाढल्या आहेत.
त्याचप्रमाणे एआय आणि एमएल अभ्यासक्रमांसाठी 2,113 जागा वाढून त्या 2,639 इतक्या झाल्या. 29 अभ्यासक्रमांच्या एकूण 21,804 जागांपैकी कॉम्प्युटर सायन्स-डेटा सायन्समध्ये 1,008 जागा, एलओटी- 381, सायबर सिक्युरिटीमध्ये 177 जागा 27,193 पर्यंत वाढल्या. अतिरिक्त 5,389 जागा वाढल्या आहेत.
तंत्रज्ञानालाच प्राधान्य
यापूर्वी अभियांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या शाखांना खूप जोर देण्यात येत होता. पण आता विकसित तंत्रज्ञानामुळे विविध अभ्यासक्रम उदयास आले आहेत. एआय आणि एमएल आधीच विशेषत: विकसनशील देशांमध्ये खूप गाजावाजा करत आहेत. सामान्य पदवीपेक्षा तंत्रज्ञानाचे ज्ञान असणाऱ्यांना नोकरीच्या अधिक संधी आहेत. हे लक्षात घेऊन अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत.
सीट मॅट्रिक्स
2022 मध्ये 207 अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून कर्नाटक परीक्षा प्राधिकरणासाठी 52,436 जागा उपलब्ध होत्या. याशिवाय 16 खासगी अल्पसंख्याक महाविद्यालयांतील 3,564 जागांपैकी 8,910 जागा सरकारी कोट्यातील होत्या. तसेच 23 खासगी विद्यापीठांमधील 17,160 जागांपैकी 7,030 जागा भरल्या गेल्या आहेत. केईएने 2023 सीट मॅट्रिक्सची मागणी करणाऱ्या कॉलेजिसना पत्र लिहिले आहे. हे पाहता बहुतांश महाविद्यालयांनी अद्याप सीट मॅटिक्स पाठविलेले नाही.
गेल्या दोन वर्षांपासून संगणक विज्ञान अभ्यासक्रमाला मोठी मागणी आहे. यानंतर विद्यार्थी एआय आणि एमएल अभ्यासक्रमांकडे वळत आहेत. या नवीन तंत्रज्ञानाचा वापर संबंधित विषयांना होईल अशा पद्धतीने करणे शक्य आहे. त्यामुळे नवीन तंत्रज्ञान अभ्यासक्रमांनाच मागणी वाढली आहे.
भविष्यात सरकारी महाविद्यालयांमध्येही
एआय, एमएल, एलओटी अभ्यासक्रमांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने आमच्या विद्यापीठांतर्गत अनेक महाविद्यालयांमध्ये हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. नजीकच्या भविष्यात आम्ही सरकारी महाविद्यालयांमध्येही असा अभ्यासक्रम सुरू करण्यास प्राधान्य देऊ.
-डॉ. एस. विद्याशंकर कुलगुरू, व्हीटीयू