I.N.D.I.A किंवा इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स या भाजप विरोधी आघाडीची तिसरी बैठक आज गुरुवारी मुंबईत सुरू होत आहे. या बैठकीसाठी कांग्रेसचे नेते राहूल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासह देशभरातील आघाडीतील इतर सदस्य़ पक्षांच्या नेत्यांनी आणि प्रतिनिधींचे मुंबईमध्ये आगमन झाले आहे.
2024 ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा पराभव करण्यासाठी बिगर भाजप पक्षाचे नेते एकत्र येत आहेत. या बैठकीकडे राजकिय जाणकारांचे आणि माध्यमांचे लक्ष लागून राहीले आहे. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि पक्षाचे नेते राहुल गांधी गुरुवारी मुंबईत इंडिया या आघाडीच्या तिसर्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मुंबईत पोहोचले आहेत.
त्याच बरोबर पक्षाचे राष्ट्रिय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यंत्री अरविंद केजरीवाल तसेच राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव, पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांच्य़ासह देशभरातील विविध पक्षाचे नेते या बैठकीला हजर राहण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत.
विरोधकांच्या या बैठकीत, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सूचित केल्याप्रमाणे, अनेक नविन पक्षांच्या सहभागासह अनेक नवीन गोष्टींवर चर्चा होणार आहे. यामध्ये जागावाटपासह राजकिय रणनितीवरही चर्चा केली जाईल. या बैठकीमध्ये इतर अनेक अजेंडांसह या आघाडीच्या नवीन लोगोचे अनावरणही होण्याची शक्यता आहे.
या नेत्यांचे स्वागत शिवसेना नेते संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन महाविकास आघाडीकडून होत असल्याने यासाठी राष्ट्रवादीसह काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यानी गर्दी केली होती.