क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
गोवा क्रिकेट संघटनेच्या क्रिकेट संघांचे ट्रेनर निनाद पावस्करची दुलीप चषक क्रिकेट स्पर्धेत खेळणाऱया दक्षिण विभागातील संघाच्या ट्रेनरपदी निवड केली आहे. पावस्कर 10 सप्टेंबर रोजी संघात सामिल होईल. या स्पर्धेचे आयोजन 8 ते 25 सप्टेंबर या कालावधीत होईल.
खोर्ली-म्हापसा येथील 35 वर्षीय निनाद पावस्करने स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये गोवा क्रिकेट संघटनेचे 14, 16, 19, 22 व 25 वर्षांखालील क्रिकेट संघांचे प्रतिनिधीत्व केले आहे. गोव्याच्या सीनियर क्रिकेट संघाचेही त्याने सुबय्या पिल्ले चषक क्रिकेट स्पर्धेत प्रतिनिधीत्व केले असून सध्या तो गोव्याच्या सीनियर क्रिकेट संघाचा ट्रेनर आहे. ऑस्ट्रेलिया स्ट्रँग्थ आणि कंडिशनिंग असोसिएशने बेंगलोरात आयोजित केलेला कोर्सही त्याने पूर्ण केला आहे.